
कोल्हापूर, प्रतिनिधी :
12 ऑगस्ट जागतिक युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक,सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर च्यावतीने गुरुवार दि.31 जुलै रोजी सकाळी 8 वाजता ‘रेड रन’ मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी दिलेली आहे.
ही स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता असून महिला व पुरुष अशा गटांमध्ये होणार आहे. सदर स्पर्धेसाठी प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी मेडल, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले जाणार असून, पहिला व दुसरा 2 क्रमांक विजेते स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुंबई येथे पाठविले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. महाविद्यालयीन विध्यार्थ्यांशिवाय इतर मुले,महिला व पुरुष मॅरेथॉन मध्ये स्पर्धेत भाग न घेता धावू शकतात. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विध्यार्थी व नागरिकांनी ‘रेड रन ‘ मध्ये भाग घेऊन, एड्स नियंत्रण जनजागृतीसाठी हातभार लावावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.
