पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
गडहिंग्लज शहरातील बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद
गडहिंग्लज, दि. २६
गडहिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत १३० कोटींहून अधिक निधी दिला आहे. त्यामुळे शहराचा कायापालट झाला असून वैभवात भर पडली आहे. या माध्यमातून गडहिंग्लज शहर देशाच्या नकाशावर अग्रस्थानी येईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
गडहिंग्लज शहरातील बेलबाग, वडरगे रोडसह अयोध्या नगर, कासार गल्ली, काजू बाग, लाखे वसाहत, शेंद्री रोड व ताशिलदार गल्ली या ठिकाणी मतदार संपर्क बैठका झाल्या. सर्वच बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज शहराच्या हद्द वाढीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून या हद्दवाढीमुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. याशिवाय गडहिंग्लज शहरातील काही राहिलेली विकासकामेही पूर्ण करू. येत्या निवडणुकीत प्रचंड मतांनी मला विजयी करण्यामध्ये गडहिंग्लजकरांचा मोलाचा वाटा असेल.
नरेंद्र भद्रापूर म्हणाले, विरोधी उमेदवाराला भेटायचं झाल्यास पहिल्या गेटमधून दुसऱ्या गेटमध्ये जायचं, त्यानंतर पीएना भेटून त्यांना आपले काम सांगायचे. त्यांना पटलं तर ते आतमध्ये निरोप देणार आणि मग भेटायचं की नाही, हे ठरणार. याउलट मुश्रीफ यांचे दार पहाटेपासून सर्वांसाठीच खुले असते.
यावेळी किरण कदम, माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी घुगरे, राजेंद्र तारळे, नरेंद्र भद्रापूर, प्रीतम कापसे सौ. मंजुषा ताई कदम, महेश देवगोंडा, एस. आर. पाटील, गुंडू पाटील, राजू कदम व अमर मांगले, सिद्धगोंडा पाटील यांच्यासह प्रमुख मोठ्या संखेने उपस्थित होते.
चौकट
प्रत्येक वेळी मांडवलीच…