येत्या हंगामात प्रतिदिन ८ हजार मे. टनाने गाळप करणार -अध्यक्ष के. पी. पाटील
बिद्री / प्रतिनिधी
बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १२ लाख टनावर ऊस उपलब्ध असून, या वर्षी कारखान्याने १० लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे. कारखान्याच्या परंपरेनुसार आगामी हंगामातही ऊस उत्पादकांना उच्चांकी ऊस दर दिला जाईल. असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले.
बिद्री ता.कागल येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या गळीत हंगामासाठीच्या रोलर पुजन प्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. या प्रसंगी श्री. पाटील यांच्या हस्ते रोलरचे पुजन करून येत्या गळीत हंगामाच्या मशिनरी जोडणीस प्रारंभ करण्यात आला.
अध्यक्ष पाटील पुढे म्हणाले, कारखान्याने सन २०२४-२५ गळीत हंगामात सरासरी साखर उतारा १२.७१ इतका मिळविला असून गळीतास आलेल्या ऊसाला प्रतिटन ३२०० रुपये पहिल्या हप्त्यात अदा केले असून १७० रुपये महिण्यापूर्वी दिले आहेत. कारखान्याने आजअखेर ३३७० रुपये ऊसदर उत्पादकांना दिला आहेत. येत्या हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार चालू केले असून, कार्यक्षेत्रातील सर्व गावांना ऊस तोडणी यंत्रणा उपलब्ध करणेसाठी प्रयत्नशिल आहोत. तरी सर्व सभासदांनी पिकविलेला व कारखान्याकडे नोंदविलेला सर्वच्या-सर्व ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवून सहकार्य करावे.
यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे, संचालक प्रविणसिंह पाटील, सुनिलराज सुर्यवंशी, धनाजीराव देसाई, राजेंद्र पाटील, पंडीतराव केणे, उमेश भोईटे, मधुकर देसाई, के. ना. पाटील, दत्तात्रय पाटील, सत्यजित जाधव, राहूल देसाई, राजेंद्र मोरे, रंगराव पाटील, दीपक किल्लेदार, रविंद्र पाटील, राजेंद्र भाटळे, संभाजीराव उर्फ एस.बी. पाटील, रणजीत मुडूकशिवाले, फिरोजखान पाटील, फत्तेसिंग भोसले-पाटील, भुषण पाटील, रामचंद्र कांबळे, सौ. क्रांती उर्फ अरुंधती पाटील, सौ. रंजना पाटील, रावसो खिलारी, संदिप पाटील, आप्पासो पाटील, कामगार संचालक शिवाजी केसरकर, राजेंद्र पाटील, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांच्यासह सर्व खातेप्रमूख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
