
कोल्हापूर :
12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूरच्या वतीने सायबर कॉलेज येथे इ. 8 वी.9 वी.व 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘रेड रिबन प्रश्नमंजुषा’ स्पर्धेचे आयोजन केले गेले. न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बाचणी ता. कागल येथील ऋग्वेदी युवराज मोहिते हिने प्रथम क्रमांक,युवाक्षी अवधूत पाटील हिने द्वितीय,तर न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल कोल्हापूरची विद्यार्थिनी सम्मिता संजय सोलापुरे हिने तृतीय क्रमांक मिळविला. प्रथम क्रमांक विजेत्या ऋग्वेदीची निवड मुंबई येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी झालेली आहे.
युवा वर्गामध्ये एचआयव्ही,गुप्तरोग,क्षयरोग या आजारांबरोबर पौगंड अवस्थेत वयात येताना होणारे बदल,समज व गैरसमज याचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी ‘महाराष्ट्र राज्य नियंत्रण संस्था वडाळा- मुंबई’ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन केल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिरपूरकर यांनी सांगितले.
समाजकार्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. टी.व्ही. जी.एस. शर्मा यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. तर समाजकार्य विभागाच्या अधिष्ठाता डॉ. सोनिया रजपूत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. विजेत्यांना सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात आली.
जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी मनोगतामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना एच. आय. व्ही., एड्स बद्दल माहिती दिली.
स्पर्धेचे संयोजन मकरंद चौधरी,विनायक देसाई, कपिल मुळे,संदीप पाटील, संजय गायकवाड,दीपक सावंत, अभिजीत रोटे, क्रांतीसिंह चव्हाण,सुजाता पाटील, शिल्पा अष्टेकर,मनीषा माने,सागर परिट यांनी केले.

